HPC म्हणजे काय? हे कशासाठी आहे?
HPC म्हणजे सर्वांगीण प्रगती पत्रिका — महाराष्ट्र शासनाने इयत्ता 1 ली ते 8 वी साठी
सुरू केलेली नवीन मूल्यमापन पद्धत. गुणांऐवजी विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासाचे
मूल्यमापन केले जाते — शारीरिक, सामाजिक, बोधात्मक, भाषा, सौंदर्य आणि अध्ययन सवयी.
एका विद्यार्थ्यासाठी किती पैसे लागतात?
Pay Per Student योजनेत: फक्त ₹10 प्रति विद्यार्थी.
30 विद्यार्थ्यांच्या वर्गासाठी फक्त ₹300 — वर्षभरासाठी.
100 विद्यार्थ्यांपर्यंत असल्यास
Unlimited Plan किफायतशीर ठरतो.
सर्व योजना पाहा →
वॉलेट रिचार्ज केल्यावर पैसे कधी कापले जातात?
नवीन विद्यार्थी जोडताना वॉलेटमधून ₹10 आपोआप कापले जातात.
विद्यार्थी आधीच जोडलेला असल्यास पुन्हा कापले जात नाहीत.
वॉलेट शिल्लक कमी झाल्यास नवीन विद्यार्थी जोडता येत नाही.
PDF मध्ये शाळेचा logo कसा दाखवावा?
सेटिंग्ज पेजवर जा → शाळेचा Logo विभागात
आपल्या शाळेचा logo अपलोड करा (JPG/PNG, 2MB पर्यंत).
अपलोड केल्यावर PDF च्या मुखपृष्ठावर आपोआप दिसेल.
Excel मधून विद्यार्थी आयात कसे करावे?
विद्यार्थी पेजवर जा → Excel आयात बटण दाबा.
Excel मध्ये हे columns असावेत (क्रमाने):
नाव | वडिलांचे नाव | आईचे नाव | जन्मतारीख
जन्मतारीख format: 2018-06-15 (YYYY-MM-DD)
आधीच जोडलेले विद्यार्थी skip केले जातात — duplicate होत नाही.
HPC अर्धवट भरल्यास data जातो का?
नाही! प्रत्येक टप्पा Save केल्यावर data सुरक्षित राहतो.
पुन्हा login केल्यावर तिथूनच सुरू करता येते.
HPC स्थिती पेजवर प्रत्येक विद्यार्थ्याची प्रगती दिसते.
एकाच वेळी सर्व विद्यार्थ्यांचे PDF कसे डाउनलोड करावे?
HPC स्थिती पेजवर जा → वर्ग निवडा → सर्व PDF (ZIP) बटण दाबा.
सर्व विद्यार्थ्यांचे PDF एका ZIP फाईलमध्ये डाउनलोड होतात.
⚠️ फक्त पूर्ण झालेल्या HPC चे PDF मिळतात
Password विसरल्यास काय करावे?
Login पेजवर जा → OTP Login tab निवडा → मोबाईल नंबर टाका → OTP ने login करा.
Login झाल्यावर सेटिंग्ज मध्ये नवीन password सेट करता येतो.